26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्‍ट्राची स्थिती गंभीर : देशात 24 तासांत 6,654 नवे कोरोनाबाधित

महाराष्‍ट्राची स्थिती गंभीर : देशात 24 तासांत 6,654 नवे कोरोनाबाधित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : लॉकडाउनमध्ये शिथिलता आणि काही प्रमाणावर ये-जा करण्याची सुविधा, यामुळे कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या आठवडाभरापासून रोज जवळपास पाच हजार नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तर या आकड्याने सह हजारचा टप्पाही ओलांडला आहे. शनिवारीही साडे सहा हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळून आले. याबरोबरच आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा लाखच्या पुढे गेला आहे. यापैकी 3700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 6,654 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 1,25,100 वर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3720 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 60, गुजरातमध्ये 27, दिल्लीत 23, तामिलनाडूमध्ये 5, बंगालमध्ये 4, राजस्थानात 3, कर्नाटकात 2 आणि जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत एका दिवसात मरणारांचा हा सर्वाधिक आकडा आहे.

Read More धर्माबादेत ३ कोरोना संशयित रुग्ण सापडले

महाराष्ट्राची स्थिती गंभीर –
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करूनही कोरोनाला लगाम घालणे अशक्य होत आहे. येथे शनिवारी 2608 रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 47,190 वर पोहोचला आहे. त्यासोबतच, आज 821 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 13,404 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. तर आता राज्यात एकूण 32,201 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिल्लीत गेल्या पाच दिवसांपासून 500 नवीन कोरोनाबाधित
राजधानी दिल्लीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सलग 500 हून अधिक नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत. येथे शुक्रवारी सर्वाधिक 660 नवे कोरोनाबाधित समोर आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या