22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रलसीकरणात महाराष्ट्र अव्वल

लसीकरणात महाराष्ट्र अव्वल

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्याही ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरुवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी म्हणजेच अडीच कोटींवर लसीकरण झाले आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेशात २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस देण्यात आली असून गुजरातमध्ये १ कोटी ९१ लाख ८८ हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये १ कोटी ८४ लाख ७६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

२१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण
केंद्राने निर्णय घेतल्याप्रमाणे २१ जूननंतर राज्यातही १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या आणि लोकसंख्येच्या निकषानुसार राज्यांना लस मिळणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात लस मिळू शकते, त्यामुळे लसीकरणाला वेग येऊ शकतो.

महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या