27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला पर्यायी सरकार देण्याची गरज होती : फडणवीस

महाराष्ट्राला पर्यायी सरकार देण्याची गरज होती : फडणवीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याला पर्यायी सरकार देण्याची गरज होती. त्यात भाजपा, एकनाथ शिंदेंचा गट आणि १६ अपक्ष यात आहेत. यात आणखी काही जण येत आहेत. ही तत्वांची लढाई आहे. महाराष्ट्राला पर्यायी सरकार देण्याची गरज होती असे फडणवीस म्हणाले.

मुंबई – दाऊदशी संबंध असल्याच्या कारणावरुन जेलमध्ये गेलेल्या मंत्र्यांचे मंत्रिपदही काढण्यात आले. राज्यपालांच्या पत्रानंतर कॅबिनेट घ्यायची नसते असे संकेत आहेत. मात्र शेवटच्या क्षणी नामांतराचे निर्णय घेतले. ते आता पुन्हा घ्यावे लागणार आहेत. राजभवनात भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे त्यांनी सांगितले. या सरकारच्या मंत्रिमंडळात फडणवीस नसतील अशीही घोषणा करण्यात आली आहे. आज संध्याकाळी साडे सात वाजता एकट्या एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या