23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी पुन्हा लांबणीवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली असून सोमवारी होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणीसाठी पुढची संभाव्य तारीख १२ ऑगस्ट ही देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा सत्तासंघर्षाची सुनावणी लांबली आहे.

सध्याच्या सरन्यायाधीशांच्या निवृत्तीची तारीख २६ ऑगस्ट आहे आणि त्यात ही सुनावणी लांबत असल्याने खंडपीठ हेच राहणार का याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच १२ ऑगस्ट हा शुक्रवार त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या काही सलग सुट्ट्या त्यामुळे सुनावणीत आणखी काही काळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तातडीच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा मेन्शनिंग करावे लागेल पण ती विनंती मान्य होईल का याची उत्सुकता लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या