21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र लवकरच शिवसेनामय दिसेल

महाराष्ट्र लवकरच शिवसेनामय दिसेल

एकमत ऑनलाईन

मुंबई : काल द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून यावेळी संपूर्ण देश मुर्मूंकडे आशेने पाहतोय. घटनेची पायमल्ली होऊ नये ही जबाबदारी राष्ट्रपतींची असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर तुम्हाला लवकरच महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत. आम्ही शिवसेनेसोबत आहोत असे शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. लवकरच तुम्हाला महाराष्ट्राचे वातावरण शिवसेनामय झालेले दिसेल असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राच्या दौ-यावर जाणार आहेत अशी माहिती राऊतांनी दिली आहे.

देशभरातून राष्ट्रपतिपदासाठी मतदान झाले. त्यामध्ये शिवसेनेचा खारीचा वाटा आहे याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच घटनेची पायमल्ली होऊ नये हे काम राष्ट्रपतींनी केले पाहिजे, त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे. राजकीय दबावातून सरकारच्या विरोधात आवाज उठवणा-याच्या विरोधात अशा कारवाया केंद्र सरकारकडून केल्या जात आहेत अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, काल राष्ट्रपतिपदाची मतमोजणी पार पडली. यावेळी शिवसेनेने विरोधात असूनसुद्धा एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर उपराष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेने यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी ६ ऑगस्ट रोजी निवडणुका पार पडणार आहेत. त्यामध्ये भाजपकडून जयदीप धनखड आणि विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या