Sunday, September 24, 2023

महाराष्ट्राचा नवा उच्चांक, २४ तासांत ६३३० नवे रुग्ण

मुंबई: महाराष्ट्रात आज कोरोना रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक निर्माण केला आहे. आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडत मागील २४ तासांत तब्बल ६३३० रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १८६६२६ झाली आहे. तर फक्त मुंबईत ८०६९९ रुग्ण झाले आहेत. तर आत्तापर्यंत ४६८९ जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत १५५४ नवे रुग्ण आढळून असून आज ८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.

आज सुट्टी देण्यात आलेल्या ८ हजार १८ रुग्णांमध्ये मुंबईमधील  ७०३३  तर पुणे येथील  ४७७, नाशिक ३३२ , औरंगाबाद मंडळ ९३ , कोल्हापूर १२ , लातूर ७ , अकोला ३१ , नागपूर ३३ रुग्णाचा समावेश आहे.

Read More  कोरोना बाधितांची संख्या चारशेच्या टप्प्यात

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या