27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडीचा पंधरा महिने टाईमपास

ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडीचा पंधरा महिने टाईमपास

एकमत ऑनलाईन

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने पंधरा महिने टाईमपास केला, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाला पूर्ण परवानगी मिळाली आहे. ओबीसी आरक्षण आमच्या सरकारने परत मिळवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने कृतीतून आरक्षण मिळवून दिले आहे. गेली दोन अडीच वर्ष आम्ही जो संघर्ष करत होतो त्याला आता फळ मिळाले, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आल्यावर न्यायालयाने सरकारला आदेश दिला की, ट्रिपल टेस्ट पूर्ण करा आणि इम्पिरीकल डेटा तयार करा. १५ महिने काही काम केले नाही, उलट केंद्राकडे बोट दाखवत होते. केंद्राच्या जनगणनेच्या आधारावर हा आकडा मिळणार नाही हे मी बोलत होतो. पण गेली १५ महिने त्या सरकारने टाईमपास केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण दिले नाही. महाविकास आघाडी सरकार हे ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही, वेळकाढूपणा करत आहे असे न्यायालयाने निर्णय दिला.

आमचे सरकार आल्याबरोबर या संदर्भात मी पहिली बैठक घेतली. बांठीया आयोग काय करत आहे याचा आढावा घेतला. १२ तारखेला आपण अहवाल दाखल केला पाहिजे या निर्णयावर आम्ही ठाम होतो. आजची तारीख दिली आणि आपल्या वकिलांनी युक्तिवाद केला. आपला अहवाल सर्वोच्च न्यायालायाने स्वीकारला. राज्यात पूर आहे. त्यामुळे पावसाळा गेल्यावर निवडणुका घ्यावा अशी आम्ही विनंती केल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या