26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी एकसंधच

महाविकास आघाडी एकसंधच

एकमत ऑनलाईन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी
मुंबई : जे जवळचे होते, त्यांनी धोका दिला. पण या बंडाच्या संकटात माझ्या पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहिली. महाविकास आघाडी कुठेही फुटलेली नाही, एकसंध आहे, असा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला.

बंडखोर आमदार-खासदार सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करत होते. पण आज विधान भवनात पार पडलेल्या बैठकीला हजेरी लावून महाविकास आघाडी अधिक जोरकसपणे भाजप आणि शिंदे गटासमोर आव्हान उभे करेल, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवत शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही, असेही नि:क्षून सांगितले. म्हणजेच भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात शिवसेना पक्ष ताकदीने महाविकास आघाडीबरोबर उभा असेल, अशी घोषणाच उद्धव ठाकरे यांनी केली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष पूर्णपणे खिळखिळा झाला. अनेक विश्वासू आमदार खासदार गेले, सत्ता पालटली. पण अडीच वर्षांआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या महाविकास आघाडीचे नेतृत्व केले, त्या आघाडीपासून फारकत घेणार नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच विधान भवनाची पायरी चढली. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी ते विधिमंडळात आले होते. बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

स्थानिक निवडणुकांत आघाडी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवल्या तर महाराष्ट्रात वेगळे चित्र दिसू शकते. त्यामुळे शक्य होईल तेथे आघाडीचे प्रयत्न करण्याचा निर्णय आज महाविकास आघाडीच्या विधानभवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रथमच विधानभवनात आले होते.

न्यायदेवतेवर विश्वास
मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. दोन गोष्टी सांगतो, न्यायदेवतेच्या डोळ््यावर पट्टी असते, पण त्याचवेळी जनता उघड्या डोळ््यांनी पाहत असते. न्यायदेवता आणि जनता लोकशाहीचे आधारस्तंभ, जोपर्यंत हे दोन्ही घटक मजबूत आहेत, तोपर्यंत देशात लोकशाहीच राहिल, बेबंदशाही येऊ देणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या