36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeपरभणीकौसडी येथील अंगनवाडीताईचा माहेरी खून

कौसडी येथील अंगनवाडीताईचा माहेरी खून

एकमत ऑनलाईन

कौसडी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील रहिवासी व अंगनवाडीत सेविका म्हणून कार्यरत असलेल्या विजया गुंजावळे व त्यांच्या आईचा संपत्तीच्या वादातून सख्या मेव्हण्यानेच खून केल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्हातील मंगरुळपिर तालुक्यातील शेलूबाजार येथे शुक्रवार दि. १३ मेरोजी घडली. या दुहेरी हत्याकांड करणा-या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

कौसडी येथील अंगनवाडीत कार्यरत असलेल्या विजया बबनराव गुंजावळे (४०) या काही कामानिमित्त आपल्या आई निर्मलाबाई भिकाजी पवार (६५) यांच्याकडे वाशिम जिल्हातील शेलूबाजार येथे भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा मेहुणा सचिन धर्मराज थोरात (४२) हा पुणे येथून आला होता. सचिन थोरात याचे मेव्हणी विजया गुंजावळे व सासु निर्मलाबाई पवार यांच्यात संपत्तीच्या कारणावरून बाचाबाची होवून याचे रुपांतर मोठ्या वादात झाले.

आरोपी सचिन थोरातने सोबत असलेल्या सुरीने निर्मलाबाई पवार व विजया गुंजावळे या माय लेकीवर सपासप वार केले. यात माय-लेकी विजया पवार व निर्मलाबाई पवार या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तात्काळ त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. पंरतु डॉक्टरांनी तपासअंती माय लेकीला मृत घोषित केले. क्रुर कृत्य करुन आरोपी सचिन थोरात हा पळून जाण्याच्या बेतात होता. पंरतु पोलिस प्रशासनाच्या सावधानतेने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून भा.दं.वि ३०२ नुसार गुन्हा नोंद झाला आहे. दुहेरी खुन खटल्याचा पुढील तपास वाशिम पोलिस करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या