28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeमहाराष्ट्रकसबा, चिंचवड पोटनिवडणूक; मतदानाच्या तारखेत बदल

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक; मतदानाच्या तारखेत बदल

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. २७ फेब्रुवारीऐवजी २६ फेब्रुवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

बारावीच्या परीक्षेमुळे मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आसल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालाच्या तारखेत बदल करण्यात आला नाही. निकाल २ मार्चलाच लागणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने पत्र प्रसिद्ध करत दिली आहे.

पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर येत्या २७ फेब्रुवारीला मतदान होणार होते मात्र या तारखेत आता बदल करण्यात आला आहे.

आता २६ तारखेला मतदान होणार आहे. बारावीची परीक्षा आणि मतदान एकाच दिवशी आल्याने या तारखेत बदल करण्यात आल्याचे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या