23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रबहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्याच अध्यक्षतेखाली ?

बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्याच अध्यक्षतेखाली ?

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे.

राज्यपालांनी विधिमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला ३० जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, उद्या होणारी ठाकरे सरकारची बहुमत चाचणी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याच अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेसाठी हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राजकीय सत्तासंघर्षात २७ तारखेला सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले होते. यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस देण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना अपात्र करता येणार नाही, नोटीस बजावलेल्या आमदारांना १२ जुलैला संध्याकाळपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या