मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी उद्या होण-या बहुमताच्या चाचणीत मतदान करण्यासाठी परवानगी मागितली आहे.सुप्रीम कोर्टात यासंदर्भातील याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फ्लोर टेस्टमध्ये (बहुमत चाचणी) मतदानाचा हक्क मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयात आाज बुधवारी (ता. २९) सायंकाळी ५ नंतर त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या फ्लोअर टेस्टविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना या याचिकेवरही सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दोघांनी मतदानाचा हक्क मागितला होता. मात्र, त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन मते कमी झाले होते. तसेच विधान परिषदेच्या वेळेही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली होती. यावेळी त्यांना कोर्टाने मतदानाचा हक्क नाकारला होता.