26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचीनसोबतचे सर्व संबंध तोडणार

चीनसोबतचे सर्व संबंध तोडणार

अमेरिकेचा इशारा, शी जिनपिंग यांच्याशी बोलण्याचीही इच्छा नाही : डोनाल्ड ट्रम्प

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा संसर्ग चीनमधून जगभर पसरल्याने आणि त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसल्याने तसेच चीनने कोरोना संदर्भात माहिती दडविल्याने चीनसोबतचे सर्व संबंध तोडण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे़ कोरोनाचा प्रसार रोखण्यामध्ये आलेल्या अपयशावरून चीनविषयी नाराजी व्यक्त करतानाच, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर तूर्त चर्चा करण्याची इच्छा नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याचवेळी चीनबरोबरील सर्व संबंध तोडण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

Read More  युरोपीयन राष्ट्रांमध्ये लॉकडाऊन शिथिल

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला असून, अमेरिकेत आतापर्यंत ८७ हजार ५३० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील बळींची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा उद्रेक झाल्याचा अमेरिकेचा आरोप असून, चीनने हा आरोप फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला. ‘सध्या शी जिनपिंग यांच्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही. गेल्या वर्षीपासून चीन अमेरिकेकडून जास्तीत जास्त माल विकत घेत आहे. मात्र, त्या व्यापार कराराचे महत्त्व पूर्वीसारखे उरलेले नाही. या करारावरील स्वाक्षºयांची शाई वाळेपर्यंतच चीनमधून कोरोना संकट उभे राहिले आहे. त्यामुळे जगातील १८६ देशांना फटका बसला असून, सर्वच देशांची परिस्थिती बिकट झाली आहे़’ असे ट्रम्प म्हणाले.

Read More  वॉर्नरचा ‘बाहुबली’ लूक होतोय हिट!

चीनच्या अध्यक्षांबरोबर कधी चर्चा सुरू करायची, याचा निर्णय अध्यक्षच घेतील, असे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव केलीग मॅकएननी यांनी नमूद केले आहे.दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी चीनच्या हुवेई कंपनीवर टीका केली. अमेरिकी नागरिकांच्या खासगी आयुष्यावर किंवा जगातील पुढील तंत्रज्ञानामध्ये तडजोड करण्याच्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
कोरोना विषाणूवर औषध व लस विकसित करण्यासाठी भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ करत असलेल्या प्रयत्नांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी कोरोनाविरोधी लढ्यातील भारतीय-अमेरिकन नागरिकांच्या योगदानाचाही उल्लेख केला. अमेरिकेतील संशोधन क्षेत्रामध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. प्रथमच अमेरिकेच्या अध्यक्षांकडून भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला आहे.

मोदी यांच्याकडून ट्रम्प यांचे आभार
नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या या काळामध्ये सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची, जगाला अधिकाधिक आरोग्यदायी करण्याची आणि कोरोनामुक्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटरची मदत करण्याचे ट्विट केल्यानंतर, त्यांचे आभार मानताना मोदी यांनी वरील प्रतिपादन केले आहे. या मदतीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीलाही अधिक बळ मिळेल, असेही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या