27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडामहाराष्ट्राच्या मालविकाने केले सायनाला पराभूत

महाराष्ट्राच्या मालविकाने केले सायनाला पराभूत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीच्या केडी जाधव इनडोअर स्टेडियममध्ये भारतीय बॅडमिंटनमधला सगळ््यात मोठा उलटफेर झाला आहे. भारताची ऑलिम्पिक मेडलिस्ट सायना नेहवालचा महाराष्ट्राच्या मालविका बनसोडने धक्कादायक पराभव केला. २० वर्षांची नागपूरची रहिवासी असणा-या मालविकाने हा इतिहास घडविला. मालविकाने सायनाचा सलग २ सेटमध्ये पराभव केला. महिला सिंगल्सच्या दुस-या राऊंडमध्ये मालविकाने सायनाचा २१-१७, २१-९ अशा सलग दोन सेटमध्ये पराभव केला. सायना-मालविका यांच्यातला हा सामना ३४ मिनिटे चालला. मालविकाचा आता पुढचा सामना आकर्षी कश्यपसोबत होणार आहे.

सायना नेहवालने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेक रिपब्लिकची खेळाडू टेरेझा स्वाबिकोव्हाविरुद्ध विजय मिळवला होता. या सामन्यात पहिला सेट २०-२२ ने गमावल्यानंतर टेरेझा स्वाबिकोव्हा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेली. ज्यामुळे सायनाला विजयी घोषित करण्यात आले होते, तर मालविकाने तिच्या पहिल्या सामन्यात सामिया इमाद फारुकीला २१-१८, २१-९ ने हरवले होते.

पी. व्ही. सिंधूचा विजय
दुस-या राऊंडमध्ये ऑलिम्पिकची दोनवेळची मेडलिस्ट पी. व्ही. सिंधूने विजय मिळवला. तिने भारताची इरा शर्माला २१-१०, २१-१० ने हरवले. दोघांमधील मॅच ३० मिनिटे चालले. तिसरा राऊंड म्हणजेच क्वॉर्टर फायनलमध्ये सिंधूचा सामना भारताच्याच अश्मिता चलिहासोबत होणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या