27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमँचेस्टर युनायटेड विकत घेणार नाही

मँचेस्टर युनायटेड विकत घेणार नाही

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : आपल्या ट्वीटमुळे चर्चेत असलेल्या टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी आणखी एक वाद ओढावून घेतला आहे. मँचेस्टर युनायटेड ही फुटबॉल टीम आपण विकत घेतोय असं त्यांनी काही तासांपूर्वी ट्वीट केलं होतं. आता आपण अशा प्रकारची कोणतीही टीम विकत घेणार नाही, तो एक जोक होता असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मस्क यांच्या या ट्वीटमुळे युनायटेड मँचेस्टर टीमच्या चाहत्यांमध्ये मात्र नाराजी आणि रागही निर्माण झाल्याचं चित्र आहे.

टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी आज एक ट्वीट करत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यांनी आपण इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड विकत घेत आहे अशी घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी असं काहीही करणार नाही असं स्पष्ट केलं. उलट हा जोक असल्याचं सांगितलं. इलॉन मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, हा ट्वीटरवरचा एक जोक होता. मी कोणतीही स्पोर्ट्स टीम विकत घेत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या