वडगावशेरी : करोनाचा पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून रिक्षाचालकांना रिक्षांमध्ये प्लॅस्टिक पडदा बसविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची तपासणी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षकांकडून (नियोजन) करण्यात येत असून पडदा नसलेल्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.
करोनामुळे रिक्षा व्यवसाय तीन महिन्यांपासून बंद होता. अटी, शर्तींवर वाहतुकीस परवानगी मिळावी, अशी मागणी रिक्षा संघटनांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालक आणि प्रवासी यांची सुरक्षा राखली जावी, यासाठी परिवहन विभागाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी आणि रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनुसार रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्या सुरक्षिततेसाठी दोघांमध्ये प्लॅस्टिकचा पारदर्शक पडदा लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यामध्ये हा पडदा असल्याने यातून प्रवासी आणि चालक यांच्यातील संभाव्य संसर्ग टाळण्यास मदत होत आहे. त्यामुळे रिक्षात असा पडदा नसताना रिक्षा चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत आहे.
Read More कोविड-१९ ची लागण न झालेल्यांवर उपचार करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा