24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeतुळजापुरात कोरोना रुग्ण आढळल्याने मंदिर संस्थान घेणार खबरदारी

तुळजापुरात कोरोना रुग्ण आढळल्याने मंदिर संस्थान घेणार खबरदारी

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी तुळजाभवानी मंदीर संस्थानने पुजारी व विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे १७ मार्चपासून श्री तुळजा भवानी मंदीरात श्री देविजींच्या दर्शनासाठी भाविकांना शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. श्री तुळजाभवानी देविजींच्या दररोज होणाèया धार्मिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने कोरोना आजाराच्या धरतीवर घ्यावयाची काळजी व रोग नियंत्रणात आणणेसाठी करावयाचे उपाययोजना म्हणून शनिवारी (दि.२३) सकाळी ११:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष सचिन रोचकरी आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

Read More  ईपीएफओ सदस्यांनी काढले ३३६० कोटी

बैठकीत आगामी काळात मंदीर भाविकांसाठी खुले करण्याबाबत काय काय उपाय केले जावेत, आगामी महिनाभर मंदीरात दररोज देविची धार्मिक पुजा करण्यास पुजारी यांची चार ते पाच नावाप्रमाणे यादी देण्यात यावी, छबीना उत्सवातील संख्या कमी करून तसेच याबाबत काय उपाय करता येईल याबाबतची चर्चा, तसेच राजमाता जिजाऊ महाव्दार व देविच्या गाभा-यात प्रवेश करणाèया प्रत्येकांना मदीर संस्थानकडून सॅनिटायझरचा वापर केला जावा असे ठरले. यावेळी बैठकीत भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, उपाध्ये पुजारी मंडळाचे अनंत कोंडो, पाळेकरी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, नागेश साळूंके, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जयqसग पाटील, बंडोपंत उपाध्ये, अ‍ॅड. डोईफोडे आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या