22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeऔरंगाबादसख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील नागद सायगव्हाण परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सोमवारी बालदिनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली.

काजल परशुराम पवार (वय १५ वर्षे), मीनाक्षी परशुराम पवार (वय १३ वर्षे, धुळे) अशी या मुलींची नावे आहेत. भिलदरी येथील गोरख पवार यांच्या वीटभट्टीवर आपल्या पालकांसह या मुली मजुरी करण्यासाठी आल्या होत्या.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा बदलून परशुराम पवार हे आपल्या कुटुंबासह नागद सायगव्हाण परिसरात वीट भट्टीच्या कामासाठी आले होते.

यावेळी त्यांच्यासोबत दोन मुलीही होत्या. दरम्यान सोमवारी या दोघी बहिणी सकाळी साडे अकराच्या सुमारास भिलदरी हद्दीतील छोट्या पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र यावेळी त्यांचा पाण्यात पाय घसरला आणि त्या पाण्यात बुडाल्या. यावेळी तिथे त्यांना वाचवण्यासाठी कोणीच नसल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या