23.4 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeमनोरंजनबर्लिनमध्ये मराठी सिनेमाचा डंका

बर्लिनमध्ये मराठी सिनेमाचा डंका

एकमत ऑनलाईन

बर्लिन : परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी लिखित वाळवी सिनेमा सुपरहिट झाला. वेड नंतर वाळवीने मराठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये येण्यास भाग पाडले.

मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी या नवरा – बायकोच्या जोडीने त्यांच्या करियरमध्ये अजून एक चांगला सिनेमा दिला आहे. वाळवी नंतर परेश मोकाशी यांचा ‘आत्मपॅम्फ्लेट’ सिनेमाचे बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रींिनग झाले. त्यावेळी आलेला अनुभव मधुगंधा कुलकर्णी यांनी शेयर केला. मधुगंधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले की बर्लिनमध्ये अमराठी लोकांनी ‘आत्मपॅम्फ्लेट’ इतकी एन्जॉय केली की सिनेमा संपल्यानंतरही खूप काळ टाळ्यांचा गजर चालूच होता. आपली मराठी माणसे, आपला देश याचे कौतुक मोलाचे आहेच पण ज्यांना भाषा कळतच नाही त्यांची दाद म्हणजे सिनेमा भाषेच्या पलीकडे जावून भावला असल्याचा संकेत आहे. परेश मोकाशी लिखित आत्मपॅम्फ्लेट सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. या पोस्टरमध्ये एका तरुण मुलाने त्याच्या तोंडावर फेस लावला असून तो त्याचे तोंड कापण्याच्या तयारीत आहे. परेश मोकाशी यांनी हा सिनेमा लिहिला आहे.

आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाची ‘जनरेशन १४ प्लस’ स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचा प्रीमियर ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. त्यानिमित्ताने मधुगंधा कुलकर्णी परेश मोकाशी सोबत बर्लिन फिल्म फेस्टिवलला गेल्या होत्या. ‘आत्मपॅम्फ्लेट’चा बर्लिन फिल्म फेस्टिवलमधील प्रीमियर शो हाऊसफुल्ल झाला होता. २२ फेब्रुवारीला सिनेमाचं स्क्रीनिंग करण्यात आले आहे. परेश मोकाशी यांनी या सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी घेतली असून आशिष बेंडे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज कधी होणार याविषयी निश्चित माहिती समोर आली नाही. पण लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी लिखित वाळवी सिनेमा आज २४ फेब्रुवारीपासून झी ५ वर रिलीज झालाय. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या