Thursday, September 28, 2023

मोजक्याच व-हाडींच्या उपस्थितीत शुभमंगल

ना बँड… ना बाजा… ना बाराती…

अर्धापूर: प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व व्यवहार व कार्यक्रम स्थगित झाले आहेत. त्यातच हजारो युवक – युवतींचे विवाह रद्द झाले असले तरी दाभडच्या एका व्यवसायिक युवकाने सर्व नियमाचे पालन करित ना बँड… ना बाजा… ना बाराती… ना थाटमाट अशा पध्दतीने शुभ विवाह उरकून घेण्याचा हट्ट धरला. आणि दि. १४ मे रोजी वधु पित्याच्या घरी नायगाव येथे मोजक्याच व-हाडीच्या उपस्थितीत शुभ विवाह संपन्न झाला.

नवरदेवाचा हट्ट आणि उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन नवरदेवाचे मामा आनंदराव टेकाळे, नातेवाईक परसराम हाळे, चंद्रकांत टेकाळे, मारुती हळे यांनी पुढाकार घेवून मोजक्‍याच नातेवाईकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स, मास्क बांधून व कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमाची काटेकोर अंमलबजावणी करून दि. १४ मे गुरूवारी सकाळी चि. संदीप हाळे व चि. सौ. कां. रंजना मोरे यांचा शुभविवाह संपन्न झाला. यावेळी वधु आणि वराकडील २० ते २५ व-हाडी मंडळी उपस्थित होते.

Read More  इंदापूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा

आजच्या परिस्थितीत वेळ आणि खचार्ची बचत करण्यासाठी भविष्यात सुध्दा अशाच प्रकारच्या आदर्श विवाह सोहळा संपन्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून विवाह सोहळ्याबद्दल परिसरातील सुज्ञ नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत पसंती दर्शविली आहे.

लॉकडाऊन नियम पाळत सवना येथे मंगल परिमय विवाह सोहळा

हिमायतनगर : प्रतिनिधी
कोरोना सारख्या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने मौजे सवना येथील नियोजित मंगलपरिमय विवाह सोहळा शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करुण आज दि १५ में रोजी सकाळी ७ वाजता भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य भगवान डोकूजि गिरबिडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

तालुक्यातील मौजे सवना येथील वधु मुलगी आयु प्रिया सतिषराव राऊत यांची कन्या तर वर मुलगा आयु दिपक आनंदराव भालेराव यांचा मुलगा हे हदगांव तालुक्यातील रावणगांव येथून १ बोलेरो गाडी घेऊन मौजे सवना येथे आले व दि १५ मे रोजी सकाळी ७ वाजता चार ते पाच नातेवाईकांच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीने मंगल परिमय विवाह सोहळा पार पडला या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य भगवान शेकूजि गिरबिडे,सवना नगरीचे सरपंच राऊत ,पत्रकार परमेश्वर गोपतवाड,हनिप सर,नागेश शिंदे सह आदि जन उपस्थित होते

यावेळी नवरदेव व नवरीला त्यांच्या नातेवाईकानी मोबाईल वरुण लग्नाच्या आॅनलाइन शुभेच्छा दिल्या व हा मंगल परिमय विवाह सोहळा पार पडताच नवरदेवाने नवरिला हदगांव तालुक्यातील त्यांच्या राहत्या घरी रावणगांव येथे नेले लॉकडाऊनच्या काळात सहा लोकांच्या उपस्थितीत मौजे सवना येथे राऊत-भालेराव परिवाराचा आदर्श मंगल परिमय विवाह सोहळा शासनाच्या नियमाचे पालन करुण सोशल डिस्टनसिंग पाळत पार पडला़

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या