21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत मास्क सक्ती; मुंबईत कोरोनारुग्णांत वाढ

दिल्लीत मास्क सक्ती; मुंबईत कोरोनारुग्णांत वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली/मुंबई : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६ हजार २९९ रुग्ण सापडले आहेत. इतकेच नाही तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख २५ हजार ७६ झाली आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट देखील ४.५८ टक्के इतका झाला आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेतल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली आहे.

देशाची राजधानी नवी दिल्लीतील आकडेवारी धक्कादायक आहे. गेल्या २४ तासांत २ हजार १४६ रुग्ण सापडले असून त्यात ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या १८० दिवसांतील ही सर्वोच्च संख्या आहे. याआधी १३ फेब्रुवारीला दिल्लीत १२ लोकांचा मृत्यू झाला होता. दुस-या बाजूला आर्थिक राजधानी मुंबईत २४ तासांत ८०० रुग्ण आढळले आहेत.

दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मंगळवारी २ हजार ४९५ रुग्ण आढळले होते. तर पॉझिटिव्हिटी रेट १५.४१ इतका होता आणि ६ जणांचा मृत्यू झाला. २१ जानेवारी रोजी दिल्लीत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १.०४ इतका होता. दिल्लीत मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मास्क न घालणा-यांना ५०० रुपयांचा दंड करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. गाडीत एकत्र प्रवास करणा-यांवर हा नियम लागू असणार नाही.

मुंबईत ७९ टक्के रुग्ण वाढले
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ८५२ रुग्ण आढळले आहेत. १ जुलैनंतर एका दिवसात झालेली ही सर्वांत मोठी वाढ आहे. आतापर्यंत मुंबईत ११,२९,२८५ रुग्ण आढळले आहेत. तर १९ हजार ६६१ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी मुंबईत १ जुलै रोजी ९७८ रुग्ण सापडले होते. एका दिवसात मुंबईतील रुग्णसंख्या ७९ टक्क्यांनी वाढली आहे. मंगळवारी मुंबईत ४७६ रुग्ण सापडले होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या