16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रजालन्याच्या स्टील कंपनीत भीषण स्फोट, ८ ते १० कामगारांचा मृत्यू

जालन्याच्या स्टील कंपनीत भीषण स्फोट, ८ ते १० कामगारांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

जालना : जालना औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत मंगळवारी सकाळच्या सुमारास स्टील वितळवणा-या भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरश: तुकडे झाले.

यामध्ये आठ ते दहा कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अनेक कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेतील जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षिततेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अनेक भीषण स्फोट घडत आहेत. यात अनेक कामगार मृत्युमुखी पडले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा कारवाईची मागणी केली होती. मात्र, याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते.

कंपनी प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या अर्थपूर्ण देवाण-घेवाणीने या प्रकरणावर पडदा टाकला जातो. पोलिस प्रशासन कंपन्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्याने त्यांचे चांगलेच फावते. त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये कामगारांचा नाहक बळी जात असल्याचे दिसून येते.

प्रशासन आणखी किती कामगारांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पोलिस प्रशासनाने कंपनी मालक व अधिकारी यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या