31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeराष्ट्रीयरामनवमी मिरवणुकीत मोठा हिंसाचार; चौघांना भोसकले

रामनवमी मिरवणुकीत मोठा हिंसाचार; चौघांना भोसकले

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : काल (गुरुवार) देशभरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. पण, कर्नाटकात मोठा जातीय हिंसाचार उसळला होता. कर्नाटकातील हसन शहरात रामनवमीच्या मिरवणुकीत मशिदीबाहेर दोन गटांत हिंसक हाणामारी झाली. यावेळी झालेल्या चाकूहल्ल्यात ४ जण गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी यातील तिघांची ओळख मुरली, हर्ष आणि राखी अशी सांगितली आहे. पोलिस म्हणाले, दोन हल्लेखोर मिरवणुकीत घुसले आणि त्यांनी चाकू चालवण्यास सुरुवात केली. यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. चन्नारायपटनाजवळ ही घटना घडली आहे.

बजरंग दलाचे कार्यकर्ते रामनवमीची मिरवणूक काढ
त होते. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा मिरवणूक बेगुर रोडवरील मशिदीजवळ पोहोचली, तेव्हा दोन व्यक्तींनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी वाद घातला आणि चार जणांना भोसकले.

आणखी एक तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. मिरवणुकीतील काही लोक त्यांच्यासोबत दगड आणि काठ्या घेऊन गेले होते, असा दावा अजहर अहमदने केला आहे. अहमदने पोलिसांना सांगितले की, रॅलीतील लोक ‘मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवा’ अशा घोषणा देत ​​होते. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याला घेरल्याचा दावाही त्याने केला आहे.

याशिवाय, काहींनी माझ्या वाहनावर दगडफेक केली. १५ ते २० जणांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अहमदने केला आहे. गुरुवारी रामनवमीच्या उत्सवादरम्यान देशभरात दोन गटांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या.

महाराष्ट्रातील छ. संभाजीनगरमध्येही मोठा हिंसाचार झाला होता. बिहारमधील मुंगेरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार उसळल्यानंतर २०० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या