23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमविआ सरकार संकटात ; शिवसेनेची कबुली

मविआ सरकार संकटात ; शिवसेनेची कबुली

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनीही पक्षाचे काही आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याला दुजोरा दिला आहे.

राऊत म्हणाले, शिवसेनेचे काही आमदार आणि एकनाथ शिंदे सध्या संपर्कात नाहीत. मविआ सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण भाजपला हे लक्षात ठेवावे लागेल की महाराष्ट्र राजस्थान किंवा मध्य प्रदेशपेक्षा खूप वेगळा आहे.

शिवसेनेचे सर्व आमदार परत येतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, मी ऐकले आहे की आमचे आमदार गुजरातमधील सुरतमध्ये आहेत आणि त्यांना जाऊ दिले जात नाही. पण ते नक्कीच परत येतील, कारण ते सर्व शिवसेनेला समर्पित आहेत. मला खात्री आहे की आमचे सर्व आमदार परततील आणि सर्व ठीक होईल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या