27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यसभेसाठी मविआत रस्सीखेच

राज्यसभेसाठी मविआत रस्सीखेच

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेच्या रिक्त होणा-या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच पहायला मिळत आहे. कारण, सहाव्या जागेवर शिवसेनेने दावा केला असून या जागेसाठी आग्रह धरला आहे. महाविकास आघाडीकडे राज्यसभेच्या चार जागा जिंकण्याची मते आहेत. सहाव्या जागेसाठी कुठल्याही पक्षाकडे विजयी होण्याइतपत मते नाहीत. या जागेवर संभाजीराजे अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय शरद पवारांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला असल्याचा दावा संभाजीराजेंच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

काय आहे संख्याबळ?
सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार असे एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत.
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपने लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.

संभाजीराजेंचा खासदारकीचा मार्ग मोकळा?
संभाजीराजे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. संभाजीराजे यांनी स्वत:ची संघटना स्थापन करून अपक्ष म्हणून राज्यसभा खासदारकीची निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत होकार दर्शवला असल्याचे बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या