27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeतंत्रज्ञानइंटरनेट डेटावहनाने गाठला कमाल वेग

इंटरनेट डेटावहनाने गाठला कमाल वेग

एकमत ऑनलाईन

मेलबर्न: वृत्तसंस्था
आॅस्ट्रेलियातील संशोधकांनी इंटरनेटच्या डेटावहनाचा वेग वाढविणारे नवे उपकरण विकसित केले आहे. त्यातून त्यांना प्रतिसेकंद ४४.२ टेराबाइट इतका प्रचंड वेग मिळाला. हा वेग इतका प्रचंड आहे की, एचडी प्रकारातील हजारभर चित्रपट सेकंदाच्याही आत डाउनलोड होऊ शकतात. या संशोधनामुळे भविष्यात जगभरात इंटरनेटचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. याबाबतचे संशोधन नेचर कम्युनिकेशन या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

मोनॅश विद्यापाठातील बिल कोरकोरान यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. हे उपकरण लेझर किरणांद्वारे डेटा वहन करते. या प्रयोगात एकाच उद्गमातून प्रतिसेकंद ४४.२ टीबी इतका कमाल वेग मिळाला. सध्याच्या फायबर आॅप्टिकला मायक्रो कॉम्ब हे विशिष्ट उपकरण जोडल्यानंतर हा वेग मिळाला. आतापर्यंत मायक्रो कॉम्ब उपकरणाच्या चाचण्या फक्त प्रयोगशाळेतच झाल्या होत्या. प्रथमच प्रत्यक्ष कार्यस्थळी ही चाचणी घेण्यात आली.

सध्या जगभरात इंटरनेटला मागणी वाढते आहे, लॉकडाउनच्या काळात तर ही गरज आणखी जास्त भासते आहे. भविष्यात इंटरनेटचा वेग वाढविण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला. गेली दहा वर्षे मायक्रो कॉम्बवर संशोधन सुरू आहे. सध्याची इंटरनेटची वस्तुस्थिती आणि भविष्यातील मागणी या संदर्भात मायक्रो कॉम्ब कसे काम करू शकते, हे या प्रयोगातून दिसल्याचे डेव्हिड मॉस
संचालक, आॅप्टिकल सायन्सेस सेंटर, स्विनबर्न विद्यापीठ यांनी सांगितले़

कसा केला प्रयोग?
– मायक्रो कॉम्ब चिप आॅस्ट्रेलियन लाइटवेव्ह रीसर्च टेस्टबेडच्या फायबर लूपला जोडल्या
– या माध्यमातून आरएमआयटी विद्यापीठाचे मेलबर्नमधील कार्यालय आणि क्लेटन येथील मोनाश विद्यापीठातील प्रयोगशाळा यांच्यात संपर्क प्रस्थापित करण्यात आला. हे अंतर ७६ किलोमीटर आहे़

प्रयोगात काय आढळले?
– मायक्रो कॉम्ब ही विशिष्ट प्रकारची इलेक्ट्रॉनिक चिप आहे. त्यापासून बनविलेले उपकरण आॅप्टिकल नेटवर्कला जोडतात. सध्यादेखील अशी उपकरणे जोडता येतात
– या उपकरणाने आॅप्टिकल नेटवर्कमध्ये ८० लेझर किरण प्रक्षेपित केले
– प्रत्येक किरण डेटा वहनासाठी स्वतंत्र चॅनेल म्हणून काम करीत होता
– मायक्रो कॉम्बने तयार केलेल्या ७० चॅनेलमधून कमाल डेटा प्रक्षेपित करण्यात आला. या नेटवर्कची बँडविड्थ चार टेराहर्ट्झ होती.
– त्यात डेटावहनाचा कमाल वेग प्रतिसेकंद ४४.२ टेराबाइट इतका मिळाला

वेगवान डेटाचा उपयोग कशासाठी?
– स्वयंचलित मोटारी
– भविष्यातील वाहतूक
– औषधनिर्मिती
– शिक्षण
– वित्तीय सेवा
– ई कॉमर्स

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या