– गेल्या १९ दिवसांत तब्बल २३७ संशयीत रुग्ण
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कारण शहरातील गोवर संशयित बालकांची संख्या वाढत असून, १ डिसेंबरपासून गेल्या १९ दिवसांत २३७ संशयीत रुग्ण आढळून आले आहे.
तर आतापर्यंत २३ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका अलर्ट झाली असून, गोवरचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
मुंबईत थैमान घालणा-या गोवरचा उद्रेक आता औरंगाबादमध्ये देखील पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसांत गोवर रुग्णाची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता संशयित रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. १ डिसेंबरपासून आजपर्यंत २३७ संशयीत रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाचीचिंता वाढली आहे.