24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeपरभणीआत्महत्याग्रस्त नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना भेटावे

आत्महत्याग्रस्त नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना भेटावे

एकमत ऑनलाईन

मानवत : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवनीत राणा आंदोलनात डायलॉग बाजी करणा-या आजींना भेटण्याऐवजी गेवराई येथील ऊस न गेल्याने आत्महत्या करणा-या नामदेव जाधव या शेतक-याच्या कुटुंबियांना भेट द्यावी असा उपहासात्मक टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.

शेतक-यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर जनआक्रोश यात्रा काढत महाराष्ट्राच्या दौ-यावर असलेल्या सदाभाऊ खोत यांनी मानवतमध्ये पत्रकारांशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संवाद साधला. पुढे बोलताना खोत म्हणाले की, बारामतीकर हे चनाक्ष आहेत त्यांना राजकारणाची हवा समजते मतांसाठी पावसात भिजलेल्या पवारांना खोतांचा टोला लावत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पवारांचा राजकीय नाद करताना सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे देखील लक्ष देणं गरजेचे आहे.

जातीयवादासाठीचे मुळ हे शरद पवार असल्याचे खोतांनी यावेळी सांगितले. शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आमची जनआक्रोस यात्रा काढली असल्याचे ते म्हणालेÞ यावेळी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सुधीर ंिबदू, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, रामभाऊ शिंदे, गणेश पाटील, शिवाजी मव्हाळे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर अवचार, ताडबोरगाव सरपंच माऊली काजळे आदींची उपस्थिती होती.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या