Thursday, September 28, 2023

बिहारमधील विरोधी पक्षांची बैठक पुढे ढकलली

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात त्यांनी देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची भेट सुद्धा घेतली होती. ही बैठक बिहारमध्ये नियोजित होती पण काही कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.

नितीश कुमार यांनी या प्रस्तावित बैठकीसाठी सर्व संबंधित पक्षांच्या प्रमुखांच्या उपस्थितीचा आग्रह धरला आहे. १२ जून रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली असून त्याची पुढील तारीख नंतर ठरवली जाईल. जेडीयूचे सर्वोच्च नेते नितीश यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांना सांगितले की, बहुचर्चित बैठकीची नवीन तारीख सर्व पक्षांशी चर्चा केल्यानंतर जाहीर केली जाईल. काँग्रेस आणि अन्य पक्षाने ही तारीख गैरसोयीची वाटल्याने मला १२ जूनची बैठक पुढे ढकलावी लागली. त्यामुळे मी बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन तारीख सुचवण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले. नितीश म्हणाले की, मी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगितली आहे. ज्या पक्षांनी बैठकीत भाग घेण्याचे मान्य केले आहे, त्यांचे प्रतिनिधित्व त्यांच्या संबंधित प्रमुखांनी केले पाहिजे.

गेल्या आठवड्यात, बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी आपला पक्ष मुख्यमंत्री आणि दुसरा ज्येष्ठ नेता या बैठकीसाठी पाठवण्याचा विचार करत असल्याचे सांगितल्यानंतर भाजपने नितीश यांच्यावर निशाणा साधला होता. पाटना येथे विरोधी पक्षांच्या बैठकीची कल्पना सर्वप्रथम पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एप्रिलमध्ये कुमार यांच्यासोबत संयुक्तपणे संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडली होती.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या