23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु

मुंबईत शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांनी भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. विधानसभा अधिवेशनात बहुमत चाचणीतही फडणवीस-शिंदे सरकारने विजय मिळवला. यानंतर
शवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात राज्यातील सगळ्या शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक सुरु झाली आहे. विधानभवनातील काही आमदारही या बैठकीला गेले असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूड पडली होती. शिंदेना शिवसेना आणि अपक्ष मिळून जवळजवळ ५० आमदारांचा पांिठबा असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले.

त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. येत्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. आमदरांच्या या बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसू नये यासाठी शिवसेना तयारीला लागली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या