23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रऔरंगाबादमध्ये सभा होणारच!

औरंगाबादमध्ये सभा होणारच!

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. औरंगाबाद पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र मनसेकडून सभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. तत्पूर्वी सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन आज राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या मैदानावर होणा-या जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन आज शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, दिलीप धोत्रे, शिरीष सावंत, अविनाश अभंयकर, संदीप देशपांडे आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या