वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यांत २० गावे हादरली. सकाळी ७ वाजता अनेक गावांत भूकंप
हिंगोली/प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये आज सकाळी सात वाजण्याच्या सूताराज भूकंपाचा सौम्य धक्के जाणवले़ या धक्यामुळे ग्रामीण भागात दहशदीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाची ३.४ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये विशेषत: वसमत तालुका, औंढा नागनाथ तालूका व कळमनुरी तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक जमिनीतून मोठे आवाज होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने आता या आवाजाची या भागातील गावकºयांना सवय झाली आहे. मात्र हे आवाज नेमकी कशामुळे येत आहेत याबाबत स्पष्ट माहिती गावक-यांनाही मिळेनाशी झाली आहे.
Read More जिल्ह्यात सेनेकडून होमिओपॅथिक गोळ्यांचा डोस देण्यास प्रारंभ
दरम्यान आज सकाळी सात वाजता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, निमटोक, टव्हा, सापळी, भुरक्याचिवाडी, पोत्रा, जांब, कवडा, येळेगाव गवळी, हारवाडी, असोला, सापळी यासह परिसरातील गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. तसेच वसमत तालुक्यातील सिरळी, कुपटी, खापरखेडा, कुरुंदा, वापटी, शिरळी, पांगरा या परिसरात तर औंढा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. जमिनीतून येणाºया गुढ आवाजाने नागरिकांची झोप उडाली आहे. या आवाजाने गावकरी घराच्या बाहेर आले असून गुढ आवाजाची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पथकाने भेट देऊन पाहणी केली होती. मात्र, आवाजाच्या गुढ बद्दल काही सांगितले नाही. त्यामुळे आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवाजाचे गुढ उकलावे, अशी मागणी या गावातील गावक-यांतून होत आहे. दरम्यान सलग तीन आवाजाने गावकºयांच्या झोपा उडाल्या आहेत.
३़४ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद
औंढा, वसमत, कळमनुरी तालुक्यातील भूकंपा बाबत जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला असता त्यांनी या भूकंपाची ३. ४ रिश्टर स्केल एवढी नोंद झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी रोहित कंजे यांनी स्पष्ट केले आहे. या भूकंपाच्या सौम्य धक्क्या मुळे ग्रामीण भागात कुठेही हानी झाली नाही. मात्र तहसील कार्यालयाच्या पथकाकडून प्रत्येक गावात पहाणी केली जाणार आहे़ तेंव्हा नागरीकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे़