35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रमन मंदिरा गजर भक्तीचा; अवघी पंढरी सुनी सुनी

मन मंदिरा गजर भक्तीचा; अवघी पंढरी सुनी सुनी

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या पंढरीनगरी मध्ये विठुरायाचा आषाढी वारी सोहळा मन मंदिरा गजर भक्तीचा इतिहासात प्रथमच भाविकांविना संपन्न झाला. आषाढी एकादशीदिनी लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात मात्र कोरोनाच्या संकटामुळे आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आल्याने आषाढी एकादशीदिनी पंढरीनगरी सुनी सुनी दिसू लागली होती.

लाखो वारक-यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी वारी सोहळा इतिहासात प्रथमच कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आला. मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेली आषाढी वारीची परंपरा झोपण्यासाठी प्रमुख ९ संतांच्या पालख्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली. याच बरोबर राज्याच्या मुख्यमंर्त्यांनी श्री विठ्ठलाची महापूजा करण्याची परंपरा असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली.

या सोहळ्यासाठी दशमी दिवशी प्रमुख संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. संतांच्या पादुकांना आषाढी एकादशी दिनी चंद्रभागेचे पवित्र स्रान घालण्यात आले. यावेळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत टाळ-मृदंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी पालखी प्रमुखांनी श्री विठ्ठलाकडे कोरोनाचे संकट नष्ट कर आणि पुढील आषाढी यात्रेला नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात पायी चालत येऊ दे असे साकडे घातले.

नगर प्रदक्षिणेनंतर सर्व पालख्या आपापल्या मठांमध्ये विसावल्या. यादरम्यान पांडुरंगाच्या रथाची वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पंढरपूरकरांनी घरातूनच पांडुरंगाच्या रथाचे दर्शन घेतले. यावेळी पंढरपुरातील सर्व रस्ते निर्मनुष्य असल्याने सुने सुने दिसू लागले होते. आज पालख्या दुपारी दोन नंतर आपल्या गावी जाण्यासाठी माघारी फिरणार आहेत. या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.
इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशी सोहळा घरी राहून विठ्ठलाचे नामस्मरण करून करावा लागत आहे.

Read More  खैरी नदीपात्रात सापडलेला प्राचीन अमुल्य ठेवा लुप्त होण्याच्या मार्गावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या