22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीपरभणीत अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार

परभणीत अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार

एकमत ऑनलाईन

परभणी : सेलु तालुक्यातील एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोंघा अज्ञात व्यक्तींनी अत्याचार केल्याची घटना घडली असून अल्पवयीन मुलीच्या आईने सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, आपली दहा वर्षीय दहा महिन्याची मुलगी व बहिणीचा मुलगा या दोघांना अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवर पळून नेले; जिंतूर तालुक्यातील कौसडी फाट्यावर मुलास मारहाण करून ढकलून दिले तर आपल्या अल्पवयीन मुलीवर कोक शिवारात त्या अज्ञात दोंघांनी बलात्कार केला.

दरम्यान सेलू पोलिसांनी मंगळवारी या घटनेबद्दल गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. सेलू पोलिसांनी या प्रकरणात जलद गतीने तपास सुरू केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या