27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रशाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’

शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’

एकमत ऑनलाईन

मुंबई : शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना शाळेत परत आणण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मिशन झिरो ड्रॉप आऊटची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.

शिक्षणाचा हक्क लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षण पुन्हा रुळावर आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे. राज्यातील शाळांमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ मोहिमेची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी राज्य सरकारने हे अभियान सुरू केले आहे.

शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, महामारीमुळे शिक्षणातील असमानता वाढली असेल, परंतु प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गळती झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना शाळेत परत आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील शाळा गळतीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणे हा या विशेष मोहिमेचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत साथीच्या रोगामुळे शिक्षण सोडलेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणता येईल. माध्यमे आणि समाजाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊन यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावे लागले. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. अशातच, राज्यातील शाळा कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर होता. राज्यभरात १३ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भात माहिती देत शाळा सुरू होण्याची तारीख जाहीर केली. विदर्भात मात्र शाळा १७ जूनपासून सुरू झाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या