22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रमोबाईल रेंज नसल्याने जाधवांबाबत गैरसमजूत

मोबाईल रेंज नसल्याने जाधवांबाबत गैरसमजूत

एकमत ऑनलाईन

चिपळूण : मुंबईतून निघालेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव गुवाहाटीला पोहोचल्याची अफवा पसरली होती; परंतु त्यांनी माध्यमांसमोर येऊन मी गुवाहाटीला नव्हे, तर गावातच आहे हे सांगितले. पक्षाला माझी गरज असेल, तेव्हा मी मुंबईत जाईन, असेही त्यांनी सांगितले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेतील एकेक आमदार त्यांच्या गोटात सामील होत आहे. रात्री ठाकरे कुटुंबीयांबरोबर असणारे आमदार दुस-या दिवशी शिंदेंच्या गोटात सामील होत आहेत. असे चित्र असताना गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आपला मुक्काम मुंबईतून हलवला.

बंधूवर झालेली शस्त्रक्रिया आणि शेतीच्या कामासाठी भास्कर जाधव चिपळुणात दाखल झाले. तेथून ते तुरंबव येथील आपल्या गावी निघून गेले. तेथे मोबाईलची रेंज नसल्यामुळे भास्कर जाधवही गुवाहाटीला गेल्याची अफवा पसरवण्यात आली. अखेर त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की, मी अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहे. मला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून राहणे आवडत नाही. मी शेतकरी असल्यामुळे शेतीची कामे आणि कौटुंबिक कामांसाठी घरी आलो आहे. गावी मोबाईलची रेंज नसल्यामुळे फोन लागत नाही. त्यामुळे मी नॉट रिचेबल होतो. याचा अर्थ मी पक्ष सोडलेला नाही. ज्यावेळी माझी पक्षाला गरज लागेल, त्यावेळी मी मुंबईत जाईन.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या