नवी दिल्ली : भारताची महान महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मिताली राज गेली २३ वर्षे क्रिकेट खेळत होती.
बुधवारी वयाच्या ३९ व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केले आहे. महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणा-या मिताली राजचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
३९ वर्षीय मिताली राजने ८ जून रोजी ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली. मिताली राजने न्यूझिलंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिच्या नेतृत्वाखाली संघ उपान्त्य फेरीपूर्वी बाहेर पडला. हा तिच्या कारकीर्दीतील शेवटचा विश्वचषक असल्याचे बोलले जात होते आणि तसेच झाले. काही वर्षांपूर्वी तिने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.