मुंबई | देशी टीकटॉक म्हणून जोरदारपणे जाहिरात केली जात असलेले आणि त्याचे शेअरिंग वाढलेले मित्रों Mitron हे एप्लीकेशन किमान ५० लाख भारतीयांनी डाउनलोड केले आहे. मात्र, चीनला विरोध करण्याच्या नादात या सर्वांनी पाकिस्तानी मित्राला जवळ केल्याचेच स्पष्ट झाले आहे.
अर्नब गोस्वामी यांच्या रिपब्लिक मिडिया ग्रुपसह अनेकांनी भारतीय एप्लीकेशन असल्याचा दावा करीत याची जाहिरात केली होती. मात्र, आता हे स्पष्ट झालेले आहे की, मित्रों हे एप्लीकेशन कोणा भारतीय कंपनी किंवा व्यक्तीचे नसून थेट पाकिस्तानी असलेल्या इरफान शेख यांनी बनवले आहे. Qboxus कंपनीचे सीईओ और फाउंडर असलेले शेख यांच्याकडेच हे बनलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय मित्रों शब्दामुळे हे सगळ्यांना भारतीय वाटत आहे. मात्र, हे पाकिस्तानात बनले असले तरीही याची मालकी कोणाकडे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
Read More धक्कादायक! औरंगाबादमध्ये आज आढळले ५२ कोरोनाबाधित रुग्ण
शेख यांनी TICTOC कंपनीचा सोर्स कोड २५०० रुपयांना विकला आहे. त्याद्वारे मित्रों Mitron हे एप्लीकेशन बनलेले आहे. त्याला रीब्रैंडेड वर्जन असे म्हणतात. शेख यांच्या कंपनीने आतापर्यंत २७७ असे क्लोन एप्लीकेशन बनवून विकले आहेत. आतापर्यंत मित्रों Mitron याचा मालक कोण हे स्पष्ट झालेले नाही. भारतातील ही कंपनी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्याला कोणताही आधार नाही. त्यातच आता याचे पाकिस्तानी कनेक्शन स्पष्ट झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. नवभारत टाईम्स या आघाडीच्या दैनिकाने ही बातमी दिली आहे.