27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद, ग्रामीण भागात कडेकोट बंद !

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद, ग्रामीण भागात कडेकोट बंद !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.८(प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंदला’ राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. विविध शेतकरी संघटना व विरोधी पक्षांनी राज्यभर आंदोलन, रास्तारोको करून या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा दिला. हे कायदे शेतकरी हिताचे नव्हे तर मुठभर धनदांडगे, उद्योगपती, साठेबाज यांच्या फायद्याचे असून यातून शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसानच होणार आहे. कोणतीही चर्चा न करता, खासदारांना निलंबित करुन हुकुमशाही पद्धतीने हे कायदे आणले गेले आहेत. या कायद्यांविरोधात देशभर आक्रोश असून शेतकऱ्यांचे हे आंदोलन आता जनतेचे आंदोलन झाले आहे, कायदे रद्द केल्याशिवाय ते थांबणार नाही, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचा मुंबईत तुरळक प्रभाव दिसला, पण ग्रामीण भागात मात्र बंदचा चांगलाच परिणाम जाणवला. भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी राज्यतील सर्व बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन केले. यावेळी केंद्रातील भाजपा सरकारच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. थोरात यांच्याबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, माजी मंत्री नसीम खान, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी मंत्री सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, आ. भाई जगताप, आ. धीरज देशमुख, आ. राजेश राठोड, आ. ऋतुराज पाटील, आ. अभिजीत वंजारी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, शेतकरीविरोधी कायद्यांमार्फत जनतेचे अन्न ताब्यात घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणून शेतमाल स्वस्तात खरेदी करण्याचे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन होत आहे. या कायद्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात काही शंका आहेत, त्यांच्या मनात भीती आहे ती सरकारने दूर करावी. पण भारतीय जनता पार्टी खोटी माहिती देऊन जनतेची, शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. काँग्रेसची भूमिका ही नेहमीच शेतकरी, सामान्य जनतेला आधार देण्याची, त्यांना मदत करण्याचीच राहीली आहे. काँग्रेसवर भाजपा करत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, दीडपट हमी भाव देऊ या आश्वासनाचे काय झाले हे भाजपाने जनतेला सांगावे, असे आव्हान थोरात यांनी दिले. काँग्रेसने जिल्हा, ब्लॉक स्तरावर केलेल्या आंदोलनालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ बार्शीत कडकडीत बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या