23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआमदार धिरज देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर

आमदार धिरज देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर

नागझरीत खते, बियाणे पुरवठा योजनेचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगाम २०२०-२१ साठी शेतक-यांना शेतकरी गटामार्फत त्यांच्या बांधावर खत व बियाणे पुरवठा योजना राबवली जात आहे. त्यानुसार लातूर तालुक्यातील या योजनेचा शुभारंभ करत असताना नागझरी येथील नागेश्वर शेतकरी गटामार्फत २१ शेतक-यांना १९५ पोते खतांचे प्रत्यक्षात वाटप व बियाणे वाटपाचे नियोजन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी बांधावर जाऊन केले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषि विकास अधिकारी सुभाष चोले, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्र कदम, २१ शुगरचे समन्वयक विजय देशमुख, लातूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश उफाडे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत उफाडे, धनंजय वैद्य, नागझरी सरपंच श्रीराम साळुंके, उप सरपंच परमेश्वर पवार, विकासेससो चेअरमन सुग्रीव पवार, निखिलेश पाटील, तालूका कृषि अधिकारी महेश क्षीरसागर मंडळ कृषि अधिकारी सचिन बावगे, कृषि पर्यवेक्षक प्रदीप रेड्डी, कृषि सहायक सूर्यकांत लोखंडे, मारुतीराव पवार, नरेश पवार, शेषेराव पांडे, हणमंत घोडके, शिवराम पवार, मनोहर पवार,नरेश पवार, ज्ञानेश्वर पवार, बालासाहेब पवार, श्रीराम पवार, दत्तू पांडे, सतीश पवार, सोमनाथ स्वामी, काकासाहेब पवार, शिवाजी वाघमोडे, भिमाशंकर स्वामी, उमाकांत पवार, नारायण घोडके, शिवराज स्वामी, बापूराव पवार, सिद्राम स्वामी, कल्याण पवार, लिंबराज पवार, अशोक पवार, शिवशंकर पवार, यासह अनेक शेतकरी उपस्थिती होती.

Read More  ‘त्यांना’ निरोप देताना

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शारिरीक दूरत्वाचे पालन करत या योजनेचा शुभारंभ प्रसंगी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार शेतकरी हा केंद्रबिंदू मानून वाटचाल करत आहे. देशातील आर्थिक मंदी व नंतर आलेला कोरोना आजार यामुळे शेती व शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. अशावेळी खरीप हंगाम २०२०-२१ कडे शेतकरी मोठ्या आशेने पाहत आहे.

सदरील हंगामासाठी सर्वतोपरी मदत शेतकºयांना करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार तत्पर असून या दृष्टीने लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले जात आहे़ त्यामुळे शेतक-यांनी हताश न होता सध्याच्या परिस्थितीवर मात करत खरीप हंगाम २०२०-२१ यशस्वी करावा असे सांगून आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी कोरोना आजाराच्या बाबतीत सर्व नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे असे सांगून सुदैवाने आपल्याकडील ग्रामीण भागामध्ये हा आजार पसरला नाही यापुढे देखील अशाच पद्धतीने सजग राहून महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन आपल्या परिवाराची व
गावाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नागझरी येथील बाळासाहेब रंगनाथ पवार या शेतकºयांच्या १ कोटी लिटर क्षमतेच्या सामूहिक शेततळ्याचे जलपुजन करुन पिकास पाणी वापरण्याचा शुभारंभ केला तसेच श्रीराम शिवाजी साळुंखे यांनी त्यांच्या दोन एकरात नव्याने लागवड केलेल्या पेरू बागेची पाहणी देखील आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या