24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रआमदार जगताप यांच्या कारला भीषण अपघात

आमदार जगताप यांच्या कारला भीषण अपघात

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीनजिक एसटी आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघातात अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. संग्राम जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. आमदार जगताप हे मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला
रसायनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. आमदार संग्राम जगताप हे आपल्या मर्सिडिज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते.

त्यावेळी हा अपघात झाला. एसटी बससोबत झालेली ही धडक अतिशय भीषण होती. यामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा चक्काचूर झाला. कारमधील एअरबॅगही उघडल्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या