23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रआमदार नितीन देशमुख रुग्णालयात

आमदार नितीन देशमुख रुग्णालयात

एकमत ऑनलाईन

मुंबई :शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाविरोधात बंड करून सुरतला गेलेल्या एका शिवसेना आमदाराची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सुरतमध्ये दाखल झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर गंभीर अवस्थेत आमदार देशमुख यांनी सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नितीन देशमुख यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. आमदार देशमुख यांना रुग्णालयात दाखल करताच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोण आहेत नितीन देशमुख?
महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघातील आमदार आहे. देशमुख हे काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत, ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात.

देशमुख यांचे भाजपच्याही काही नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मागील विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभूत करण्यासाठी आमदार देशमुख यांनी भाजपला मदत केली, असा आरोप शिवसेनेच्याच पदाधिका-यांनी केला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या