22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeनांदेडसंदीप भोपाळे या तरुणाने शरीरावर गोंदला आमदारांचा टॅटू

संदीप भोपाळे या तरुणाने शरीरावर गोंदला आमदारांचा टॅटू

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : प्रत्येक व्यक्तीला कशाची ना कशाची क्रेझ असते. कुणाला वाचणे, कुणाला शिकण्याची, तर कुणाला खेळण्याची क्रेझ असते. मात्र हिमायतनगर येथील संदीप भोपाळे या तरुणाने हदगाव हिमायतनगरचे आमदार माधव पाटील जवळगावकर यांचा बॉस म्हणून टॅटू शरीरावर काढून घेतल्याने शहरातील तरुणांमध्ये आमदार साहेबांची क्रेझ वाढल्याचे दिसून येत आहे

सध्या लाखो जण आपल्या शरीरावर स्वत:च्या मर्जीने टॅटू बनवून घेतात. कधी हा टॅटू त्यांच्या जोडीदाराच्या नावाचा असतो तर कधी त्याच्याशी संबंधित एखाद्या गोष्टीचा असतो. मात्र हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधव पाटील जवळगावकर यांच्या चाहत्याने चक्क त्यांचा फोटोच त्याच्या हृद्यावर गोंदून घेतला आह. तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आमदार या मतदार संघातील जनतेला मिळाला असल्याची भावना संदीप भोपाळे यांनी व्यक्त केल्या. आमदार माधव पाटील जवळगावकर यांचे त्यांनी आभार मानले. तरुणांच्या या प्रेमामुळे मी आगामी काळात तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल असे आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, परमेश्वर गोपतवाड, शहराध्यक्ष संजय माने, मोहन ठाकरे, सचिन माने, किरण माने, शाम ठाकरे, अरव्ािंद वानखेडे, वैभव श्ािंदे, परमेश्वर भोयर, सूरज दासेवार, गणेश रामदिन वार आदी तरुण उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या