26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेच्या खासदारांसह आमदारही शिंदे गटाच्या गळाला; ठाकरेंना धक्के पे धक्का

शिवसेनेच्या खासदारांसह आमदारही शिंदे गटाच्या गळाला; ठाकरेंना धक्के पे धक्का

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. अजूनही शिवसेनेमध्ये गळती कायम आहे. दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक हे ऐन दसरा मेळाव्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. एकीकडे दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. आता शिंदे गट ठाकरे गटाला झटका देण्याच्या तयारीत आहे. दसरा मेळाव्या दरम्यान ठाकरे गटातील अनेक नेते, नगरसेवक आणि काही आमदार शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गट दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करत आहे. यावेळी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी हे शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याचे वृत्त आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक हे ऐन दसरा मेळाव्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या आठ लोकप्रतिनिधींसह एकूण दहा ते पंधरा शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याचे बोलले जात आहे. हा शिवसेनेसाठी मोठा हादरा मानला जात आहे.

आधीच शिवसेनेतील ४० आमदार आणि अनेक पदाधिकारी व नगरसेवक हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यात आता दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिंदे गटात शिवसैनिक सामील होणार आहेत. त्यामुळे ते खासदार आणि आमदार कोण आहेत, याची चर्चा रंगली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या