23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयरस्ते अपघाताचे प्रमुख कारण मोबाईल

रस्ते अपघाताचे प्रमुख कारण मोबाईल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक तिसरा मृत्यू राष्ट्रीय महामार्ग किंवा द्रुतगती मार्गावर होतो. आश्­चर्याची बाब म्हणजे रस्ते अपघातात सर्वाधिक बळी हे तरुण आहेत. विशेषत: मोबाईलच्या वापरामुळे होणारे रस्ते अपघात हे टाळता येऊ शकतात, असे या विषयावरील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोबाईलवर बोलत असताना, वाहन चालवताना लक्ष कमी होते, त्यामुळे धोकाही वाढतो. त्याकडे स्वत: लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहन चालवताना, रस्ता ओलांडताना किंवा चालताना मोबाईलचा वापर करू नये.

देशभरात रस्त्यांचे जाळे विणले जात असून भारतीय रस्ते लवकरात लवकर परदेशी रस्त्यांसारखे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी अनेक प्रयत्नही केले जात आहेत. मात्र या सगळ्यात रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे. देशात दररोज रस्ते अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मद्यपान करून वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे किंवा रॅश ड्रायव्हिंगमुळे अपघाताच्या घटना घडू शकतात. परंतु या प्रकरणांशिवाय आता मोबाईलच्या वापरामुळे अपघाताच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. यामध्ये काही घटना अशा आहेत, ज्या मोबाईलचा वापर करून वाहन चालवल्याने घडतात. तर काही घटना मोबाईलवर बोलत चालत असताना घडल्या आहेत.

दरवर्षी १७,००० मृत्यू
रस्ते वाहतूक आणि महामार्गांच्या आकडेवारीनुसार, मोबाइल फोनच्या वापरामुळे दरवर्षी सुमारे १७,००० लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा धक्कादायक आहे. या आकडेवारीवर विश्वास ठेवला तर २०१८ मध्ये १७५६० लोकांचा मृत्यू केवळ मोबाईल वापरल्यामुळे रस्ते अपघातात झाला.

सन २०२० मध्ये २६.३ टक्केंचा बळी
दुसरीकडे, २०१९ या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, २६.३ टक्के लोक अपघाताचे बळी ठरले. तर २०२० मध्ये २६९७ लोक रस्ते अपघातांचे बळी ठरले. मात्र यामध्ये हिमाचल प्रदेशची आकडेवारी देण्यात आलेली नाही. त्यापैकी ५.२ लोक हे राष्ट्रीय महामार्गावर मोबाईलचा वापर करून रस्ते अपघातात बळी पडले आहेत.

२३ ते ३५ वयोगटातील तरुण समावेश
या अहवालानुसार २३ ते ३५ वयोगटातील सर्वाधिक तरुण रस्ते अपघातांना बळी पडतात. २०२० मध्ये या वयोगटातील सुमारे ३५ हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. काही प्रकरणांमध्ये, अतिवेग हे देखील कारण मानले गेले आहे. या सर्वांशिवाय मद्यपान करून गाडी चालवणे आणि सिग्नलचे नियम मोडणे, या कारणांचाही समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या