मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात कालपासून राजकीय भूकंपाचे वारे वाहू लागले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह साधारण ४६ आमदार फुटल्याच्या मार्गावर आहेत.
त्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे. राजकारणी आहोत त्यामुळे सर्वच पक्षांनी नेहमी निवडणुकांसाठी तयार राहिले पाहिजे असे म्हटले आहे. यावेळी भुजबळ यांनी नरेंद्र मोदींबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुकारामांच्या भेटीला देहूत आले आणि एकनाथाला घेऊन गेले, असेही छगन भुजबळ म्हणाले.