24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयमोदी सरकार लष्करातील रेजिमेंटचे नाव, गणवेश बदलणार

मोदी सरकार लष्करातील रेजिमेंटचे नाव, गणवेश बदलणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार रस्त्यांची आणि इमारतींची नावे बदलत आहे. अलीकडेच सरकारने राजपथचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ केले . याशिवाय, मोदी सरकारने नौदलाचा जुना ध्वजही रद्द केला. जुन्या नौदलाच्या ध्वजावर किंग जॉर्ज क्रॉसचे चिन्ह होते. आता हा ध्वज नौदल म्हणून ओळखला जाणार आहे.

त्याच वेळी, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता भारतीय लष्करातील वसाहती प्रथा, युनिट्स आणि रेजिमेंटची नावं रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार, जनरल मनोज पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्याने वसाहती प्रथा आणि दलातील युनिट्स आणि रेजिमेंटची नावं काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा मानस व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने लष्करातील ब्रिटिश वसाहतवादी नावे, प्रथा, परंपरा अन्य अनेक अशा गोष्टी ज्यांना गुलामीच्या खुणा म्हणू शकतो ते काढून टाकण्यात येणार आहे.

कुचकामी प्रथांपासून दूर जाणे आवश्यक
लष्कराच्या दस्तऐवजात म्हटले आहे की, ‘काही वारसा प्रथा ज्यांचे पुनरावलोकन आवश्यक आहे जसे की वसाहतवादी आणि पूर्व-वसाहत काळातील प्रथा आणि परंपरा, सैन्याचा गणवेश आणि वेशभूषा, नियम, कायदे, धोरणे, युनिट स्थापना, वसाहती भूतकाळातील संस्था, काही युनिट्सची इंग्रजी नावं, इमारती, आस्थापना, रस्ते, उद्याने, ऑचिनलेक किंवा किचनर हाऊस सारख्या संस्थेचे नाव बदलणे. लष्कराच्या मुख्यालयातील एका अधिका-याने सांगितले की, ब्रिटिश वसाहतवादी वारसा दूर करताना पुरातन आणि कुचकामी प्रथांपासून दूर जाणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी लोकांना पाळण्यास सांगितलेल्या पाच प्रतिज्ञांच्या अनुषंगाने राष्ट्रीय भावनांशी जुळवून घेण्यासाठी भारतीय सैन्याने या वारसा पद्धतींचे पुनरावलोकन करणे देखील आवश्यक आहे.

रेजिमेंटची नावे बदलण्यात येणार
मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय लष्कराच्या खांद्याभोवती दोरी लावण्याचाही विचार केला जात आहे. याशिवाय, रेजिमेंटच्या नामांतराचाही विचार केला जात आहे. ज्या रेजिमेंटची नावे बदलल्याचा दावा केला जात आहे, त्यात शीख, गोरखा, जाट, पंजाब, डोगरा, राजपूत आणि आसाम या इन्फंट्री रेजिमेंटची नावे आहेत. या रेजिमेंट्सची नावे बदलण्यात येणार आहेत. कारण, त्यांची नावे ब्रिटिशांच्या रेकॉर्डनुसार ठेवण्यात आली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या