24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमोदी शिखर संमेलनात सहभागी होणार

मोदी शिखर संमेलनात सहभागी होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आजपासून म्हणजे २६ जून ते २८ जूनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दौ-यावर आहेत. जर्मनीमध्ये जी-७ शिखर संमेलनात प्रधानमंत्री मोदी सहभागी होणार आहेत.

याआधी २ मे रोजी पंतप्रधान जर्मनीच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स यांनी पंतप्रधान मोदी यांना जी-७ शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले होते. या परिषदेदरम्यान पंतप्रधान पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांवर आपले विचार मांडणार अशी अपेक्षा आहे.

या परिषदेसाठी अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या इतर लोकशाही देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या