22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमोदींचे प्रकल्पाचे आश्वासन, मुलाची समजूत काढण्यासारखे

मोदींचे प्रकल्पाचे आश्वासन, मुलाची समजूत काढण्यासारखे

एकमत ऑनलाईन

फॉक्सकॉनवरून शरद पवारांचे टीकास्त्र
पुणे : वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे दुर्दैवी आहे. हा प्रकल्प परत महाराष्ट्रात येऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी राज्यात मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन लहान मुलाची समजूत काढण्यासारखे फसवे असल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

वेदांता प्रकल्पाच्या बदल्यात दुसरा मोठा प्रकल्प देण्याचे आमिष दाखवले जात आहे. याला काही अर्थ नाही. या प्रकल्पासाठी तळेगाव हीच योग्य जागा होती. वेदांताकडून असे अनेक प्रकल्प गुजरातला हलवले आहेत. त्यामुळे आता यावर चर्चा करून काही फायदा नाही, असे शरद पवार म्हणाले. हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्यात येत आहे. पण सामंत, शिंदे हे आमच्या सरकाच्या वेळेस मंत्री होते. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करणे योग्य नाही, असाही टोला त्यांनी लगावला. तसेच जर नरेंद्र मादी यांनी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी मदत केली तर त्यांच्या भूमिकेचे स्वागत करू. पण सद्यस्थितीवरून हा प्रकल्प महाराष्ट्रात येणे शक्य नाही. त्याच्या बदल्यात मोदींनी मोठा प्रकल्प देण्याचे आमिष हे रडणा-या पोराला फुग्याचे आमिष दाखवल्यासारखे आहे, असा टोला पवारांनी लावला.

चारवेळा मुख्यमंत्री होऊनही
प्रकल्प आणता आले नाहीत
शरद पवार हे महान नेते आहेत. चार-चार वेळा मुख्यमंत्री होऊनही त्यांना प्रकल्प आणता आला नाही, तेच आज टीका करत आहेत, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. आता टीका करण्यापेक्षा विधायक कामांसाठी सहकार्य करावे, असाही टोला त्यांनी लगावला. फॉक्सकॉन-वेदांता वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या