27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडामोदींची महान हॉकी प्लेयर मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली

मोदींची महान हॉकी प्लेयर मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आज राजकीय क्रिडा दिवस आणि महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी काही वर्षात क्रिडा क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीवर मोदींनी भाष्य केलं. गेल्या काही वर्षात क्रिडा क्षेत्रात प्रगती झाली आहे. पुढील वर्षांतही क्रिडा क्षेत्रात अशी प्रगती होत राहो आणि क्रिडा क्षेत्रात देशाचं नाव मोठं व्हावं असं मोदी म्हणाले.

मोदींनी त्यांच्या ट्विटरवरही क्रिडा दिवसाच्या शुभेच्या देत खास पोस्ट शेअर केली आहे. सगळ्यांना राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. दरवर्षी हॉकी प्लेयर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण देशभऱ्यात साजरा केल्या जातो.

ऑलंपिकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणारे मेजर ध्यानचंद हे हॉकी टीममधले चांगले प्लेयर होते. त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यावेळी ऑलिंपिकमध्ये १८५ देशांनी सहभाग घेतला होता. भारतासाठी त्यांनी ५७० गोल काढले होते.

राष्ट्रीय क्रिडा दिवसाच्या पर्वावर गल्ली बोळींमध्ये खेळाचे महत्व पोहोचवण्यासाठी युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयाद्वारे आज देशातील २६ शाळांमध्ये क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या